गुन्हेगारी

अशाेका मेडिकव्हरमध्ये गरबा; दोघांवर गुन्हा दाखल

नाशिक : गरबा, रास दांडियाला प्रतिबंध असताना देखील वडाळा राेडवरील अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये गरबा खेळणाऱ्या एचआरसह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल परिसरात गरबा नृत्य सुरु असल्याची माहिती मुंबई नाका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पाेलिस अशोका हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस आले असता हॉस्पिटलचे एचआर मॅनेजर आशिष सिंग, मॅनेजर संदीप सूर्यवंशी यांनी स्टाफसाठी गरबा आयोजन केल्याचे दिसून आले. म्युझिक सिस्टीमवर शंभर ते दीडशे स्त्री-पुरुष गरबा डान्स करत होते. याप्रकरणी वरील दाेघांसह म्युझिक सिस्टीम ऑपरेटर संतोष दिलीप शेवकणेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉस्पिटल्स परिसर सायलेन्स झोन म्हणून घोषित असताना अशा पद्धतीने मोठ्या आवाजात गरबा आयोजित करण्यात आल्याने सर्व स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या आयोजनाचा हॉस्पिटल्समधील रुग्णांना किती त्रास झाला असेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे