गुन्हेगारी

जितेंद्र आव्हाड यांना अटक व जामीनावर सुटका

मुंबई : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करुन त्यांची जामिनावर सुटका करण्यातआली. अनंत करमुसे या व्यक्तीचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून याच गुन्ह्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेली कारवाई अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती.

जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर तरुणाने केला केला होता. फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने या तरुणाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली होती. यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही दावा तरुणाने केला होता. याच प्रकरणात आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे