गुन्हेगारी

बांगलादेशात दुर्गापूजा मंडपात तोडफोड, तिघांचा मृत्यू

दिल्ली ः बांगलादेशमध्ये एका फेसबूक पोस्टमुळे भडकलेल्या हिंसेमुळं अनेक मंडळांच्या दुर्गा पुजा मांडवांमध्ये तोडफोड करण्यात आली आहे. त्यात किमान 150 हिंदू अल्पसंख्याक कुटुंबावर हल्ले झाले आहेत. यात तिघांचा मृत्यू झाला.

बांगलादेशच्या कोमिल्ला जिल्ह्यात एका दुर्गा पुजेच्या मांडवात कुरणाचा अपमान झाल्याची अफवा पसरल्यानंतर हिंसाचार झाला. अनेक हिंदू मंदिरे, घरे आणि दुकानांची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. पश्चिम बंगालच्या अनेक संघटनांनी बुधवारी रात्री या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला आहे. विश्व हिंदू परिषदेनं या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मांडवामध्ये कुराण ठेवल्यानंतर कोणीतरी त्याचा फोटो काढला आणि व्हीडिओ तयार करून तिथून फरार झाला. त्यानंतर काही वेळातच फेसबूकवर कुरआनच्या अपमानाची पोस्ट व्हायरल झाली. या हिंसेनंतर निर्माण झालेल्या तणावामुळे बांगलादेश हिंदू युनिटी काऊन्सिलच्या ट्विटरद्वारे मुस्लीम समुदायाला अफवांवर विश्वास न ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. काऊन्सिलनं पंतप्रधानांकडे त्याठिकाणी लष्कर पाठवण्याची मागणीही केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे