गुन्हेगारी

लासलगावला दीड लाखांच्या बनावट नाेटा हस्तगत

नाशिक ः बनावट नाेटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना लासलगाव पाेलिसांनी अटक करून दीड लाख रुपयांच्या बनावट नाेटा हस्तगत केल्या आहेत.

लासलगाव पाेलिसांनी मोहन बाबुराव पाटील, प्रतिभा बाबुराव घायाळ (रा. बोराडे हॉस्पीटलजवळ, लासलगाव), विठठल चपांलाल नाबरीया (रा. कृषिनगर लासलगाव) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी रुद्र हिरामण राऊत (रा. स्मारक नगर, ता. पेठ) व विनोद मोहनभाई पटेल (रा. पंचवटी) आम्हाला ५०० रुपयांच्या बनावट नोटा देणार असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर, लासलगाव पोलिसांनी विंचूर येथील येवला-रोडवर सापळा रचून रवींद्र हिरामण राऊत, विनोद पटेल यांना ताब्यात घेत त्याचा कारमधून ५०० रुपयांच्या २९१ नोटा ताब्यात घेतल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे