अपघात

तिघा मेडिकल रिप्रेझेंटेटीव्हचा अपघातात मृत्यू

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील नांदूर शिंगोटेतील हॉटेल अन्विता समोर फार्मसी कंपनीची पुण्यातील बैठक आटाेपून स्विफ्ट कारने नाशिककडे येणाऱ्या एकाच कंपनीतील तिघा मेडिकल रिप्रेझेंटेटीव्हचा (एमआर) अपघातात मृत्यू झाला. मृतांत नाशिकच्या दाेघांचा समावेश आहे.

अपघातात कारमधील शरद गोविंदराव महाजन (वय ३९, रा. म्हसरुळ, नाशिक), भूषण बाळकृष्ण बधान (वय ३६, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) आणि राजेश तिवारी (३४, रा. कल्याण, ठाणे) तिघे जागीच ठार झाले. तिघेही मॅनकाईंड या औषध कंपनीचे प्रतिनिधी होते. मंगळवारी पहाटे एमएच १५ सी. टी. १७२१ या क्रमांकाच्या स्विफ्ट कारने तिघे नाशकात परतत असताना आयशर वाहनाने त्यांच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे