आरोग्य व शिक्षण

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे सिन्नर तालुक्यातील पांगरीची शाळा बंद

नाशिकः सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत 200 च्या जवळपास रुग्ण वाढत आहेत. तालुक्यातील पांगरी येथे वाढत्या कोरोना रुग्णांमुळे सात दिवस शाळा बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायत व आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला आहे. सोबतच संत हरिबाबा विद्यालय अकरा ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पांगरीत सध्या कोरोनाचे 18 रुग्ण सक्रिय आहेत.

सिन्नर तालुक्यातील नागरिकांचा नगरशी सातत्याने संबंध येतो. त्यामुळे येथील रुग्ण वाढत असल्याची शंका आहे. सिन्नर, निफाड, येवल्या तालुक्यात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. येथे रुग्ण वाढणे कमी झाले नाही, तर पुन्हा निर्बंध लावावे लागतील, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. तसेच या शहरातील हॉटस्पॉट शोधून चाचण्या वाढवा. तात्काळ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू करा. कठोर निर्बंध लावण्याची वेळ आणू नका, असा इशाही भुजबळांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे