गुन्हेगारी

बॉलिवूड चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांच्या घरावर, कार्यालयावर छापे 

मुंबई : कॉर्डिला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात नार्कोटिक कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईत बॉलिवूड चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले. मुंबई-गोवा क्रूझ पार्टीत अटक करण्यात आलेल्या अचित कुमारच्या चौकशीत इम्तियाज खत्रीचे नाव समोर आल्याने छापेमारीला सुरुवात झाली.

इम्तियाज खत्री हा बॉलिवूडमधील नामांकित निर्माता आहे. त्याने हिंदीसह मराठी सिनेमांचीही निर्मिती केली आहे. सुबोध भावेचा हृदयांतर या सिनेमाची निर्मिती केली आहे. इम्तियाज खत्री हे नाव सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात होतं
बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात इम्तियाज खत्री यांचं नाव आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे