कृषीवार्ता

जिल्ह्यात अतिवृष्टीचे पंचनामे ड्रोनद्वारे होणार

नाशिक : सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे पंचनामे करताना एकही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करा, अशी सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत “अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे पंचनामे हे बिनचूक करण्यात येऊन केलेल्या पंचनाम्यांचा अहवाल लवकरात लवकर शासनाला सादर करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य देण्यात यावे. जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळण्यासाठी मदत होईल,” असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

बैठकीत “जिल्ह्यातील ज्या भागात पावसाअभावी पिकांची हानी झाली आहे, त्या क्षेत्राचेदेखील पंचनामे करण्यात यावेत. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मदत होईल,” असे मत झिरवाळ यांनी मांडले. जिल्ह्यात 2020-21 या वर्षात तौक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने जून 2021 मध्ये शेतीपिके, घरे, मनुष्यहानी अशा विविध बाबींसाठी जिल्ह्याला एकूण 28 कोटी 69 लक्ष अनुदान प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील 400 गावे बाधित झाले आहेत. या सर्व क्षेत्राचे पंचनामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याकरता क्षेत्रीय अधिकारी पूर्ण क्षमतेने काम करतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे