अपघात

ललित हायड्राेलिक कंपनी स्फोटातील जखमी तिघा कामगारांचा मृत्यू

नाशिक ः सातपूर औद्याेगिक वसाहतीतील ललित हायड्राेलिक सिस्टिम कारखान्यात शनिवार, (दि.१८) सप्टेंबर) रोजी झालेल्या शक्तिशाली स्फाेटातील सहा कामगार गंभीर जखमी झाले होते. त्यातील रोशनलाल व चंद्रकांत निमसे यांचा मुंबई मधील खासगी हॉस्पिटलमध्ये तर सूरज पेखले यांचा नाशिकमधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

यातील जखमी तिघा कामगारांवर उपचार सुरू आहेत. या कारखान्यात ऑइल प्रेशरचे सिलिंडर तयार केले जातात. शनिवारी सायंकाळी कारखान्यात नायट्राेजन सिलिंडरच्या टेस्टिंगचे काम सुरू हाेते. यावेळी कारखान्यात ११ कामगार काम करीत हाेते. यावेळी सिलिंडरचा व्हॉल्व फाटून हा स्फाेट झाला. त्यात सहा कामगार गंभीर भाजले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे