राजकारण

परब यांच्या विरोधतात कदमांकडून दारुगोळा; ऑडिओ क्लिप व्हायरल

मुंबई : शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि प्रसाद कर्वे नावाच्या व्यक्तिच्या तीन कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या तिन्ही क्लिपमधून रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री अनिल परब विरोधातील दारुगोळा पुरावल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, रामदास कदम यांनी या ऑडिओ क्लिप फेक आहे, या संभाषणाशी आपला संबंध नसल्याचे सांगत हा आपल्या बदनामीचा कट असल्याचे म्हटले आहे.

 • ऑडिओ क्लिप एक
  प्रसाद कर्वे: हॅलो
  रामदास कदम: कुठे आहेस?
  प्रसाद कर्वे: आहे… दापोलीत आहे.
  रामदास कदम: आला का किरीट सोमय्या? आला? ओके. तू किती वाजता येणार आहेस त्याला घेऊन.
  प्रसाद कर्वे: तो मला त्याचा कार्यक्रम संपला की फोन करणार आहे.
  रामदास कदम: ओके ओके ओके, पण मग तिथून निघताना मला फोन लाव
  प्रसाद कर्वे: हो, लावतो… लावतो
  रामदास कदम: म्हणजे इथे मग कुणाला मी थांबवणार नाही ना
  प्रसाद कर्वे: हा… चालेल, चालेल
  रामदास कदम: सर्वांना पाठवून देईल
  प्रसाद कर्वे: हो, चालेल
  रामदास कदम: बाकी मिटिगं छान झाली ना
  प्रसाद कर्वे: हो, छान झाली, छान झाली
  रामदास कदम: येडा आहे रे तो. त्याला समजत नाही काही
  प्रसाद कर्वे: काय नाय हो, गैरसमजूतीने हे झालं म्हणूनच मी तुमच्या पाठी लागलो. बाकी काही नाही
  रामदास कदम: हो हो… आपण त्याला समजवायला नको.
  प्रसाद कर्वे: हो
  रामदास कदम: त्यांनी एक फोन लावायला हवा होता. विचारायला हवं होतं. असं कसं
  प्रसाद कर्वे: मी त्यांना जेव्हा घटना घडली तेव्हा सांगितलं होतं तुम्ही भाईंना डायरेक्ट फोन लावा.
  रामदास कदम: एक्झॅट… एक्झॅट… परफेक्ट
  प्रसाद कर्वे: हो
  रामदास कदम: आता काल त्याला कळलं असेल ना
  प्रसाद कर्वे: हो, कळलं कळलं कळलं. हो
  रामदास कदम: हे बदमाश आहेत बाकीचे लोक
  प्रसाद कर्वे: हो… हो
  रामदास कदम: त्याला बाजूला करायचं आहे ना त्यांना
  प्रसाद कर्वे: आणि थोडं काय आहे ना भाई, काही लोकं दादा आणि केदार यांच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
  रामदास कदम: म्हणूनच दादा आणि केदारसाठी आपण बसलो होतो ना. तो विषय संपून जाईल ना तो.
  प्रसाद कर्वे: हो… हो
  रामदास कदम: तो विषय संपून जाईल ना
  प्रसाद कर्वे: हो… हो
  रामदास कदम: असं काय, ते आपण होऊ देणार नाही यांचं. काल मी ज्या स्टाईलने बोललो ते तुमच्या लक्षात आलं असेल सगळं.
  प्रसाद कर्वे: हो… हो
  रामदास कदम: कोणीही असलं तरी काय बोलायचं ते बोललो मी. जास्त लाड झाले. तू ये निघताना फोन लाव मला.
  प्रसाद कर्वे: हो, लावतो… लावतो
  रामदास कदम: ओके… ओके… ओके
 • ऑडिओ क्लिप 2
  रामदास कदम: हॅलो
  प्रसाद कर्वे: भाई प्रसाद बोलतोय.
  रामदास कदम: हां बोल
  प्रसाद कर्वे: हां, ते जे… महावितरणलाही त्यांनी कागद दिले आहेत त्याच्या नावाने. कनेक्शन घेतलं आहे.
  रामदास कदम: काय ते?
  प्रसाद कर्वे: महावितरणला त्याने कनेक्शन त्याच्या नावाने घेतलंय अनिल परबच्या नावाने.
  रामदास कदम: हो ना…
  प्रसाद कर्वे: हो हो… ते तुम्हाला पाठवलं बघा.
  रामदास कदम: हो, पण तो नाही म्हणतोय ना. माझा काही संबंध नाही बांधकामाशी म्हणतोय.
  प्रसाद कर्वे: हो… विभागसाठी उद्या फौजदारी गुन्हा दाखल करतोय म्हणतोय पोलीस स्टेशनला.
  रामदास कदम: ओके ओके
  प्रसाद कर्वे: दोघांच्या विरुद्ध… दोघांच्या विरुद्ध…
  रामदास कदम: त्याने अॅफिडेव्हिट द्यायला पाहिजे पण…
  प्रसाद कर्वे: घेतलं. नोटरी केली त्यांनी.
  रामदास कदम: हां… बास बास बास…
  प्रसाद कर्वे: हां. नोटरी केली त्याने.
  रामदास कदम: मग काय अडचण नाही.
  प्रसाद कर्वे: हो हो हो
  प्रसाद कर्वे: त्याने नोटरी केलं. आता गुरुवारी येऊन तो फौजदारी गुन्हा दाखल करतोय.
  रामदास कदम: ओके ओके ओके
  प्रसाद कर्वे: हा घएऊन च येतोय… किरीट सोमय्या घेऊनच येतोय त्याला.
  रामदास कदम: हो ना
  प्रसाद कर्वे: हो हो
  रामदास कदम: ओके ओके, येईल अडचणीत येईल. शंभर टक्के अडचणीत येईल.
  प्रसाद कर्वे: हो हो
  रामदास कदम: हम्म (काही सेकंद शांतता) मी येतो 23 तारखेला संध्याकाळी खेडला.
  प्रसाद कर्वे: 24ला
  रामदास कदम: 23 ला
  प्रसाद कर्वे: ठिक आहे ठिक आहे. हो चालेल
  रामदास कदम: ओके

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे