अपघात

केरोनाने पतीचा मृत्यू; मुलीसह पत्नीची आत्महत्या

नाशिक : कोराेनामुळे पतीचे निधन झाल्यानंतर सात वर्षीय मुलगी वडीलांची आठवण काढत असल्याने जगण्याला काही अर्थ नाही, अशी सुसाइड नाेट लिहून मुलीसह आईने आत्महत्या केल्याची घटना विनयनगर येथे घडली.

सुजाता प्रवीण तेजाळे (३६) व अनया प्रवीण तेजाळे ( वय ७, दाेघी रा. सुखसागर अपार्टमेंट, विनयनगर, मुंबईनाका) असे आत्महत्या केलेल्या माय लेकीची नावे आहेत. सुजाता यांनी लिहिलेली सुसाइड नाेट पाेलिसांच्या हाती लागली असून, सुजाता यांचे दीर अशाेक तेजाळे हे घरी गेले असता, ही घटना उघडकीस आली. मुंबईनाका पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे