अपघात

गिरणारेत बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार

नाशिक ः नाशिक तालुक्यातील गिरणारे वन परिमंडळातील माैजे वडगाव शिवारात गुरुवारी (दि. ३०) रात्री घराच्या पडवीबाहेर खेळणाऱ्या शिवन्या निंबेकर या सहा वर्षीय बालिकेवर बिबट्याने झडप घातली. यात ती गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

गिरणारे वन परिमंडळातील वडगाव शिवारात निंबेकर यांच्या मळ्याजवळ असलेल्या घरातून पडवीत शिवन्या आली असता, बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली. तिच्या ओरडण्याचा आवाज येताच कुटुंबीयांनी घराबाहेर धाव घेतली असता, ती जखमी अवस्थेत आढळली. तिला तत्काळ रुग्णालयात हलविले. मात्र, दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच नाशिक पश्चिम वनविभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. घटनास्थळालगत रात्रीच पिंजरा लावण्यात आला. रात्रभर या परिसरात वन कर्मचाऱ्यांच्या गस्तीपथकाकडून पेट्रोलिंग केले जात होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे