राजकारण

25 वर्षात 25 हजार कोटींचे मालक भुजबळांचे पालकमंत्रीपद काढून घ्या ः कांदे

नाशिक: भुजबळांनी अधिकार नसतानाही नियोजन निधीचे वाटप केले. त्यामुळे त्यांचे पालकमंत्रीपद काढून घ्यावे. भाजीपाला विकणारे छगन भुजबळ 25 वर्षात 25 हजार कोटींचे मालक कसे झाले? भुजबळ हे केवळ भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थीच नाही तर प्राचार्य आहेत. भुजबळांविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत हे सर्व पुरावे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले आहेत, असे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.

कांदे म्हणाले, 12 कोटी निधी आला यातील 10 कोटी रुपये भुजबळांनी ठेकेदारांना वाटले. माझ्या मतदारसंघात फक्त 2 कोटी दिले. भुजबळांना नियोजन निधी वाटपाचा अधिकारच नाही. अधिकार नसताना त्यांनी निधी वाटप करून गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे त्यांचे पालकमंत्रीपद काढून घ्यावे. भुजबळ आणि माझा वाद हे महाविकास आघाडीचे भांडण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनीही भुजबळांवर टीका केली. भुजबळांनी नियोजनाचा निधी काँट्रॅक्टरच्या घश्यात घालायचे काम केले आहे. शिवसेना स्वबळावर लढणारी संघटना आहे. पालिका निवडणुका तोंडावर आहे. आम्हाला गुंड्या-तोड्या करण्याची गरज नाही. भुजबळांनी भ्रष्टाचार केला आहे. आमच्याकडे पुरावे आहेत. मी त्यांच्यासमोर केव्हाही चर्चेला तयार असल्याचे आव्हानच करंजकर यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे