अपघात

कर्जाला कंटाळून मोडाळेत शेतकऱ्याची आत्महत्या

नाशिक ः सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील शेतकऱ्याने गुरुवारी रात्री (दि. 2) शेतातील घरात गळफस लावून आत्महत्या केली. सुभाष दामू गोवर्धने (वय-५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुभाष गोवर्धने यांची मोडाळे येथे पाच एकर शेती आहे. शेतीवर सोसायटी कर्त आहे. तसेच इतर ठिकाणांहून शेतीच्या भांडवलासाठी हातउसनवार पैसे त्यांनी घेतले आहे. त्याच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार त्यांना फायनान्स कंपनीकडून वारंवार फोन येत होते. त्यामुळे ते सतत विवंचनेत असत. गुरुवारी सकाळी ते शेतात गेले आणि तेथेच शेतीत असलेल्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्याच दरम्यान वडिलांना शेतीकामात मदतीसाठी गेलेल्या त्यांच्या मुलाने हा प्रकार पहिला. गोवर्धने यांच्या पश्चात, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातू असा परिवार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे