गुन्हेगारी

आसाराम बापू आश्रमाचा संचालक अटकेत, गुजरात पोलिसांची नाशकात कारवाई

नाशिक ः १२ वर्षांपासून फरार असलेल्या व नाशिकमधील गंगापूर रोडवरील आसाराम बापू आश्रमाचा संचालकास गुजरात पोलिसांनी नाशिकमधून अटक केली आहे. संजय किशनकिशोर वैद असे या शिष्याचे नाव आहे. त्याच्यावर अहमदाबाद येथे प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे.

गुजरात पोलिसांच्या या कारवाईची स्थानिक पोलिसांना माहिती नसल्याने पंचवटी पोलिस ठाण्यात या संदर्भात वैदच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात अाला. मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर पहाटे गुजरात पोलिसांच्या कारवाईची उकल झाली. वैद हे गुरूवारी पंचवटीतील सेवाकुंज भागात गाईंना पशू खाद्य खरेदी करण्यसाठी आश्रमात गेले होते. सेवाकुंज येथील नागसेठीया पशू खाद्य दुकानात ते खरेदी करीत असतांना इनोव्हा कारमधून आलेल्या अनोळखी चौघांनी त्यांना दमदाटी करत वाहनात बसवून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले हाेते. दरम्यान मध्यरात्री उशीरा हे अपहरण नसून त्याला अहमदाबादला तेथील पोलिसांनी नेल्याचे पुढे आले. तत्पूर्वी पंचवटी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचे तपासाधिकारी एपीआय रोहीत केदार यांना या गुन्ह्यातील अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याचे आदेश मिळाल्यावर गुन्ह्याचे घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. पंचवटी पाेलिसांनी दोन टीम बनवून क्रिस्टा गाडीचा शोध घेतला असता सीडीआरच्या विश्लेषणावरुन अपह्रत व्यक्ती अहमदाबाद येथील प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात बारा वर्षापासून फरार होता. म्हणूण अहमदाबाद क्राईम ब्रँच नाशिकला आले व त्याला अहमदाबादला नेले. याबाबत साबरमती पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे