वृत्त-विशेष

शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी बागलाणच्या सुनबाई

निरपूर : (शशिकांत पवार) : शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महिला सनदी अधिकारी भाग्यश्री बानायत- धिवरे यांची नियुक्ती शासनाने केली आहे. त्या नाशिक जिल्ह्यातील सटाणा गावच्या स्नुषा आहेत. जिल्ह्याच्या सूनबाईंच्या हाती आता साई संस्थानचा कारभार आला असल्यामुळे जिल्ह्यातून व खासकरून बागलाणवासीयांकडून त्यांचे स्वागत केले जात आहे.

त्या यापूर्वी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य रेशीम व वस्त्रोद्योग महामंडळाच्या संचालिका होत्या. कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. साई संस्थानचे यापूर्वीचे मुख कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या बदलीबाबत नेहमी उलटसुलट चर्चा होत असे. अखेर शासनाने बगाटे यांच्या जागी बानायत यांची नियुक्ती केली आहे. त्या २०१२ मधील बॅचच्या नागालँड केडरच्या आयएएस अधिकारी असून, यापूर्वी त्यांनी आसाम येथे गृहविभागाच्या सचिव, त्यानंतर महाराष्ट्रात रेशीम उद्योग महामंडळाच्या कार्यकारी संचालिका अशा पदांवर सेवा केली आहे. त्यांचे पती संजय धिवरे आयकर विभागात सहआयुक्त आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे