आरोग्य व शिक्षण

अकरावी प्रवेशासाठी जातप्रमाणपत्र देण्यास मुदतवाढ

नाशिक : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीच्या प्रमाणपत्राअभावी अकरावी प्रवेशासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे जातीचे प्रमाणपत्र नाही. काहींनी जातीच्या प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दाखल्याअभावी प्रवेशास अडचणी येत आहेत. शिक्षण संचालनालयाने खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळालेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रवर्गाबाबत कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव दाखल केला आहे, अशांनी प्रस्तावाची पोच आणि सोबत वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर केल्यास ते प्रवेशासाठी पात्र असतील. ज्या विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र आणि प्रस्तावाची पोचही नाही त्यांनी वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र आणि हमीपत्र दिल्यास ते मागास प्रवर्गातून प्रवेशासाठी पात्र राहतील. परंतु या अटींवर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना ३० दिवसांत स्वत:चे जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. अन्यथा त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होतील. व्हीजेएनटी, ओबीसी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासोबत उन्नत व प्रगत मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे