आरोग्य व शिक्षण

घरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला

नवी दिल्ली ः सप्टेंबरपासून विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत २५ रुपयांनी वाढली आहे. या दरवाढीनंतर आता दिल्लीत १४.२ किलो सिलिंडरची किंमत ८८४.५० रुपये झाली.

आता १४.२ किलो विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडर दिल्ली-मुंबईत ८८४.५ रुपये, कोलकात्यात ९११ रुपये आणि चेन्नईत ९००.५ रुपयांनी विकण्यात येत आहे. यापूर्वी ते क्रमश: ८५९.५ रुपये, ८८६ रुपये आणि ८७५ रुपये विकण्यात येत होते. घरगुती एलपीजी सिलिंडरच नाही, तर १९ किलो असणारा औद्योगिक वापरासाठीचा सिलिंडरही महाग झाला आहे. दिल्लीत औद्योगिक वापरासाठीचा सिलिंडर १६१८ रुपयांऐवजी १६९३ रुपयांना विकला जात आहे. एक जानेवारीपासून आतापर्यंत आठ महिन्यांत सिलिंडरच्या किमतींत १९० रुपयांची वाढ झाली आहे. एक जानेवारीला दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ६९४ रुपये होती. आता दर वाढून ८८४.५ रुपयांवर पोचली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे