आपला जिल्हा

पंचायत राज समितीच्या ३ दिवसांच्या जेवणावर ९ लाखांचा खर्च

नाशिक : पंचायतराज समितीचा तीनदिवसीय दौऱ्यात समितीमधील २५ सदस्य आणि ६ निमंत्रित अशा ३१ सदस्यांच्या चहा, नाश्ता आणि जेवणावळीसाठी नऊ लाखांचा खर्च झाला आहे.

विधिमंडळाच्या पंचायतराज समितीने २६ ते २८ ऑगस्टदरम्यान नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. समितीची मुक्कामाची व्यवस्था शहरातील विविध खासगी हॉटेलमध्ये होती, तर जेवण मात्र शासकीय विश्रामगृहावर देण्यात आले. तीन दिवस चहा, नाश्ता आणि दोन वेळचे जेवण देण्यात आले. त्यातही तीन दिवसांत समिती सदस्य आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी प्रत्येकी एकवेळचे जेवण दिल्यानंतरही समितीने एवढा मोठा खर्च केल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

तीन दिवसांत १२०० ताटे जेवण देण्यात आले. त्यात समितीमधील अनेक सदस्यांनी श्रावणातील गुरुवार, शनिवार असूनही मटणावर ताव मारल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. समितीच्या दौऱ्यासाठी लाखोंची उधळपट्टी करून काय साधले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे