राजकारण

गिरणा कारखाना ही भुजबळांची बेनामी मालमत्ता, आता जितेद्र आव्हाड ईडिच्या फेऱ्यात ः किरीट सोमय्या

नाशिक: मालेगाव तालुक्यातील गिरणा साखर कारखानाही भुजबळांची बेनामी मालमत्ता आहे. मागील आठवड्यात आयकर विभागाने भुजबळांची १३० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यांना महिन्याभरात अटक होऊ शकते. मुंबईत सांताक्रुझ येथे भुजबळांची 9 मजली इमारत आहे. या इमारतीत अख्खं भुजबळ कुटुंब राहतं. या इमारतीबाबतीही भुजबळांनी खुलाशा करावा, बिल्डिंगची त्यांचा संबंध काय? ही इमारत परवेज कन्स्ट्रक्शनच्या नावाने आहे. ईडीच्या लिस्टमधील १२ वा खेळाडू राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमध्ये केला.

किरीट सोमय्या आज नाशिकमध्ये आले होते. त्यांनी छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी करत त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत भुजबळांवर आरोपाचा भडिमार केला. मुंबईत सांताक्रुझ येथे भुजबळांची 9 मजली इमारत आहे. ही इमारत परवेज कन्स्ट्रक्शनच्या नावाने आहे. त्याच्याशी तुमचा संबंध काय? या इमारतीचं भाडं तुम्ही भरता की ही इमारतच तुम्ही विकत घेतली आहे? ही इमारत बांधण्यासाठीचा पैसा कुठून आला? असे प्रश्न उपस्थित करत परवेज कन्स्ट्रक्शन ही बोगस कंपनी असून या कंपन्या चालवणारे लोक बनावट आहेत, असा सोमय्या यांनी आरोपक केला. शनिवारी या इमारतीची पाहणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भुजबळाच्या इमारतीचे मालक कोण? हे सांगावं, असं आव्हानही त्यांनी दिले.

ईडीच्या लिस्टमधील १२ वा खेळाडू कोण आहे? असा प्रश्न त्यांना केला आसता त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेत अधिक बोलणे टाळले. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी एका ट्रस्टचे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेत रूपांतर करून ७० कोटी रुपयांची मालमत्ता आपल्या पीएच्या नावावर केल्याचा आरोप केला. परब यांच्याविरोधात मी पहिली तक्रार दिली होती. त्याची सुनावणी सुरू आहे. परब यांच्या मर्जीतील अधिकारी बजरंग खरमाटे यांचीही चौकशी सुरू आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना लपवून ठेवलं. आमदार प्रताप सरनाईक यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, असं सोमय्या म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे