कृषीवार्ता

भाव पडल्याने टोमॅटो पिकात सोडल्या मेंढ्या

अंदरसूल ः टोमॅटोच्या भावात सतत घसरण होत असल्याने येवला तालुक्यातील संतप्त शेतकऱ्याने टोमॅटोच्या उभ्या पिकात मेंढ्या चरण्यास सोडून दिल्या. टोमॅटोचे पीक उपटून संताप व्यक्त केला.

अंदरसूल येथील शेतकरी ज्ञानेश्वर जाधव यांनी एक एकरमध्ये टोमॅटोचे पीक घेतले होते. टोमॅटोबरोबर ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर हेही पीक घेतले होते. मात्र, त्यालाही भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. टोमॅटोला प्रत्येक क्रेटला ३० ते ४० रुपये भाव मिळत असल्याने तीन ते चार रुपये किलो दराप्रमाणे टोमॅटो विक्री होत आहेत. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचा उत्पादन खर्चदेखील निघणे मुश्कील झाल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याचे, तसेच रस्त्याच्या कडेला फेकून देत आहे. टोमॅटो उत्पादनासाठी क्रेटमागे चाळीस रुपये खर्च येतो. बाजार समितीत भाव मिळतोय फक्त वीस रुपये. म्हणजे रुपया किलो. याचा अर्थ उत्पादित केलेले टोमॅटो विक्रीसाठी २० रुपये पदरचे खर्च करायचे. थोडक्यात, दोन रुपये किलोमागे खर्च आणि भाव मिळणार एक रुपया किलो. यात मशागत, बियाणे, औषध फवारणी, ड्रीप, प्लास्टिक कागद हा खर्च पकडलेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे