आपला जिल्हा

येवल्यात अंगणवाडी सेविकांचे ‘मोबाईल वापसी’ आंदोलन

येवला : अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले कमी क्षमतेचे मोबाईल महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती येवला संघटनेने पंचायत समिती येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प शाखेमध्ये जमा करून आंदोलन केले.

अंगणवाडी सेविकांना दैनंदिन काम करण्यासाठी, तसेच बालकांची नोंद, हजेरी, पोषण ट्रेकिंग संदर्भातील कामांसाठी शासनाच्या वतीने मोबाईल देण्यात आले होते. मात्र, हे मोबाईल कमी क्षमतेचे असल्याने अंगणवाडी सेविकांना कामे करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. अनेक वेळा दैनंदिन काम करूनसुद्धा केवळ मोबाईलच्या अडचणीमुळे त्यांची गैरहजेरी लावली जाते. वारंवार लेखी- तोंडी तक्रार करूनसुद्धा अधिकारी लक्ष देण्यास तयार नसल्याने सर्व अंगणवाडी सेविकांनी एकत्र येऊन मोबाईल वापसी आंदोलन केले. चांगल्या दर्जाचे मोबाईल देण्यात यावे, तसेच पोषण ट्रॅकर अ‍ॅप मराठीमधून असावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी प्रकल्पप्रमुख जिजाबाई जगझाप, बीटप्रमुख संगीता रेशमे, मधुबाला जाधव, बेनी गाडे, वैशाली पोपळघट, शीतल शेटे, मनीषा पाटे आदींसह येवला तालुका बीट मधील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. जोपर्यंत चांगल्या दर्जाचे मोबाइल आणि पोषण ट्रॅक आहार अ‍ॅप मराठीत उपलब्ध होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रकल्पप्रमुख जिजाबाई जगझाप यांनी याप्रसंगी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे