वृत्त-विशेष

अडसरेत महिलांकडून दारू अड्डे उद्ध्वस्त

इगतपुरी : तालुक्याच्या पूर्व भागातील अडसरे बुद्रुक येथील रणरागिणी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तरुण कार्यकर्त्यांसह सरपंच संतू साबळे, पोलिसपाटील, ग्रामपंचायत सदस्य आदींनी गावातील अवैधरीत्या गावठी दारू विक्री करणारे व्यावसायिक व अडसरे गावात दारू पुरविणाऱ्यांना मुद्देमालासह पकडून घोटी पोलिसांच्या ताब्यात दिले.

अडसरे बुद्रुक येथील महिलांनी गावातील गावठी दारूविक्री व पुरवठा यावर कायमस्वरूपी बंदी करावी याविषयी ग्रामपंचायतीत ठराव केला होता. अवैधरीत्या सुरू असलेल्या गावठी दारू धंद्याविरोधात आंदोलनदेखील केले होते, पण त्याला न जुमानता बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्यांनी धंदा सुरूच ठेवल्याने आज (ता. ३०) सरपंचांसह ग्रामपंचायत पदाधिकारी, आदिवासी लायन फाउंडेशन, मनसे कार्यकर्ते व महिलांनी गावठी दारूविक्री करणारे बाळू देवराम साबळे, चंद्रभागा बाळू साबळे, बाळू फोडसे, शिवाजी महादू पोटे, सीताबाई सखाराम मेंगाळ, तसेच पुरवठा करणारे देवाचीवाडी येथील विष्णू गांगड, शकुंतला गांगड आदींना घोटी पोलिसांच्या
ताब्यात दिले. यावेळी मनसे कार्यकर्ते किरण साबळे, प्रथमेश मुंडे, गोटू तातळे, मंगेश आढाव, गोरख चौरे, दिलीप साबळे, सुरेश साबळे, प्राणिकेत मुंढे, भरत साबळे, अनिल गवारी, सखाराम जाधव आदींसह पोलिसपाटील, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे