राजकीय

भाजपचे शहराध्यक्ष पालवेंवर गुन्हा

नाशिक : कराेना संकटात गर्दी जमविणे व निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या जनआशिर्वाद यात्रेतील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर राज्यभरात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नाशिकमध्येही विनापरवानगी राेड शाे आणि जनआशिर्वाद यात्रा काढणाऱ्या भाजपच्या शहराध्यक्षांवर अंबड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी (दि. २८) पाथर्डी फाटा ते उंटवाडी दरम्यान आयाेजित जनआशिर्वाद यात्रेला पाेलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी परवानगी नाकारली हाेती. तरीही भाजपचे शहराध्यक्ष गिरीष पालवे यांनी हजाराेंच्या उपस्थितीत ही रॅली काढली. पाेलिस नाईक आव्हाड यांच्या तक्रारीनुसार अंबड पाेलिस ठाण्यात पालवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. बाईक रॅलीसह खुल्या जिप गाडीत उभे राहत डॉ. पवार यांच्या यात्रेची सुरवात झाली. ढोलताशाच्या गजरात व फटाक्यांच्या अतिशबाजीत खुद्द केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून कोरोना नियमांची ऐशी-तैसी करण्यात आली. ना मास्क, ना सामाजिक अंतर, ना नागरिकांचा प्रतिसाद, ना जनतेचा आशीर्वाद, तरीही खा. डाॅ. पवार यांनी कोरोनाचे असतील नसतील तेवढे सर्व नियम पायदळी तुडवत सिडकोतून जनआशीर्वाद यात्रा काढून एकप्रकारे पंतप्रधानांच्याच आदेशाचे नियम धाब्यावर बसवले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे