अपघात

पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

नांदगाव : पोहण्यासाठी गेलेल्या यशवंत विजय बैरागी या तरुणाचा नांदगाव- मालेगाव रोडवरील निसर्ग हॉटेलसमोर वनविभागाच्या हद्दीतील बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला.

यशवंत मित्रांसोबत पोहण्यासाठी या बंधाऱ्यावर गेला होता. यातील एक तरुण पाण्यात उडी मारून पोहून किनाऱ्यावर येऊन बसला. त्यानंतर यशवंत बैरागी याने पाण्यात उडी मारली, परंतु बराच वेळ झाला तरी तो वर आला नाही. हे त्याच्यासोबत असलेल्या मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात लोकांना माहिती देऊन मदतीला बोलावले व त्यास बाहेर काढले. त्याला नांदगाव येथे उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत गणेश नन्नावरे याने नांदगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे