राजकीय

प्रांताधिकार्‍यांच्या निलंबनासाठी येवल्यात धरणे आंदोलन

येवला ः महिला तलाठ्याकडे शरीरसुखाची मागणी करणार्‍या येवल्याच्या प्रांताधिकाऱ्यांना निलंबित करावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी भटक्या जाती-जमाती महासंघ, वंचित, तसेच कार्यकर्त्यांनी शहरातील विंचूर चौफुली येथे धरणे आंदोलन केले.

तालुक्यातील एका महिला तलाठ्याचा विनयभंग करण्यात आला. दुसर्‍या महिला तलाठ्याकडून लाचेची रक्कम घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका महिलेने विनयभंग व दमबाजी केल्याप्रकरणी प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या महिलांनी भटक्या विमुक्त संघटनेकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येऊन संबंधित प्रांताधिकाऱ्यांना अटक करावी. त्यांची सखोल चौकशी करून निलंबित करावे, यासाठी जमाती महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. ‘वंचित’चे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे, संजय पगारे आदींसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. निवेदनावर भटक्या जमाती संघटनेचे शरद राऊळ, कालिदास अनावडे, धीरज परदेशी, किशोर सोनवणे, भाऊसाहेब अहिरे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे