कृषीवार्ता

पीकविमा, नुकसानभरपाईसाठी मेंगाळ जाणार उच्च न्यायालयात

घोटी ः इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे संबंधित अधिकारी व तलाठ्यांमार्फत पंचनामे केले. मात्र, पीकविमा कंपनीने बहुतांशी शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसानभरपाई दिलेली नाही. शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडून त्वरित भरपाई मिळावी यासाठी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहेत.

ज्या शेतकऱ्यांनी पीकविम्याच्या पावत्या भरल्या असतील त्यांनी घोटीत बाळा गव्हाणे यांच्या संपर्क कार्यलयात जमा कराव्यात, असे पत्रकार परिषदेत सांगितले. भाताच्या कोठारात सतत अस्मानी संकटाने शेतकरी बेजार झाले असून, पीकविमा भरला असतानादेखील शेतकरी अजून मदतीपासून वंचित आहेत. विशेष म्हणजे, बँकेच्या वतीने ज्या शेतकऱ्यांना पीकविम्याचा पावती कोड दिला आहे, तोसुद्धा चुकीचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किती पीकविमा भरला आहे ते लक्षात येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा भरल्याच्या पावत्या घोटीत जमा कराव्यात, असे आवाहन मेंगाळ यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे