अपघात

फेसबुकवर पोस्ट करुन बससमोर तरुणाची आत्महत्या

औरंगाबाद ः वैयक्तिक आयुष्याला कंटाळलेल्या तरुणानं फेसबूकवर पोस्ट करत आत्महत्या केली आहे. पैठण तालुक्यातल्या अमरापूर वाघूडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

अखिल भारतीय छावा युवक संघटनेच्या पैठण तालुका युवक अध्यक्षाने एसटी बससमोर येऊन उडी मारुन आत्महत्या केली आहे. महेश शिंदे पाटील असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. मंगळवारी रात्री नेवासा- नगर महामार्गावरील कांगोणी फाट्याजवळ त्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. महेश गेल्या अनेक दिवसांपासून तणावात होता. अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून तालुका युवक अध्यक्षपदावर महेश काम करत होता.
या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका अशी फेसबुकवर पोस्ट केली. पोस्ट टाकल्यानंतर त्याचे मित्र, जवळील नातेवाईक अशा अनेकांनी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानं आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईल बंद करुन ठेवला होता. त्याच्या पोस्टवर बऱ्याच जणांनी कमेंट करुन असं टोकाचं पाऊल उचलू नकोस, अशी विनवणी केली. मात्र तोवर महेशनं धक्कादायक पाऊल उचललं होतं.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे