महाराष्ट्र

सह्याद्री अतिथिगृहाच्या डागडुजीसाठी कोट्यवधींची बिले

मुंबई ः व्हीव्हीआयपींसाठी बांधण्यात आलेल्या सह्याद्री अतिथिगृहावर कोट्यवधींची डागडुजी करून बिले लाटली आहेत. एवढे पैसे खर्च करूनही सह्याद्री गेस्ट हाउसमध्ये सीलिंग कोसळण्याच्या दुर्घटना कशा घडतात?, हा प्रश्‍ देखील उपस्थित होतो.
सह्याद्री अतिथिगृहाच्या डागडुजीसाठी थोडेथोडके नाही, तर एक कोटी ८९ लाख ३२ हजार ९३० रुपये खर्च करण्यात आला आहे. एवढे पैसे फक्त सीलिंग दुरुस्त करणे, तीन फुटांची कपाउंड वॉल बांधणे, खिडक्या-दरवाजे बसवणे, वूडन फ्लोरिंग बसवणे, संडास, बाथरूम दुरुस्त करणे, अशी फक्त डागडुजी करण्यात आली आहे. या कामासंदर्भात प्रकल्प शाखेनेही संशय व्यक्त केला होता. प्रकल्प शाखा म्हणजे, जे पीडब्ल्यूडीच्या अखत्यारित जे काही काम चालते त्यावर ही शाखा नजर ठेवते आणि यांचा शेरा महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे एवढ्या कोट्यवधींची कामे केल्यानंतर स्वाभाविक आहे, प्रकल्प शाखेने छायाचित्रे मागविली. त्यावर निघालेले दरवाजे, खिडक्या वाळवीच्या प्रादुर्भावामुळे एकदम पोखरून खराब झाल्या आहेत. त्यामुळे ते निकामी झाल्याने डेब्रिजमध्ये फेकून देण्यात आले, असे उत्तर त्यांना देण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे