राजकारण

लग्नास हजर राहून नाचणारही; बच्चू कडू यांचे आडगावकर कुटुंबीयांना आश्वासन

नाशिक, दि. १६ ः आपण आडगावकर कुटुंबाच्या पाठीशी असून, रसिका दिव्यांग असल्याने माझे तर कर्तव्यच आहे. लग्नासाठी दोन दिवस हजर राहून लग्नात नाचेल देखील, असे आश्वासन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आडगांवकर आणि खान कुटुंबीयांना दिले. नाशिकच्या दौऱ्यावर आले असताना लव्ह जिहाद प्रकरणी दबावाखाली असलेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. यामुळे या आंतरजातीय विवाहाला विरोध करणाऱ्यांना चपराक बसली आहे.

नाशिकमधील सुप्रसिद्ध आडगांवकर सन्स या सोन्या चांदीच्या दुकानाचे मालक प्रसाद आडगावकर यांची मुलगी रसिका आणि मंझूरभाई खान यांचा मुलगा आसिफ यांनी आपल्या कुटुंबियांच्या सहमतीने आंतरजातीय विवाह करण्याचे ठरवले होते. मात्र, काही कट्टरवाद्यांनी हा प्रकार लव्ह जिहादचा असल्याचा अपप्रचार करून आडगावकर कुटुंबावर लग्न रद्द करण्यासाठी दबाव आणला गेला होता. त्यांमुळे दि १८ रोजी होणार विवाह सोहळा या दोन्ही कुटुंबाना रद्द करावा लागला होता. याआधी मात्र, रसिका आणि आसिफ यांनी कायद्याप्रमाणे विवाह नोंदणी कार्यालयात रीतसर लग्न केले होते. विवाह रद्द झाल्यापासून दोन्ही कुटुंब मोठ्या दहशतीखाली वावरत होते. ही घटना माध्यमांनी उचलून धरल्यानंतर समाजातील अनेकांनी या लग्नासाठी पाठिंबा दिला.

शुक्रवार दि १६ रोजी नाशिकच्या दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तिडके कॉलनी येथील आडगांवकर यांच्या निवासस्थानी भेट देत या दोन्ही कुटुंबांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन देत लग्नासाठी स्वतः हजर राहण्याचे आश्वासन दिले. तसेच, दोन्ही मुले कुठल्याच प्रकारे धर्मांतर करणार नसून या विवाहाला कुटुंबाची सहमती असल्याने लव्ह जिहादचा प्रश्नच नसल्याचे सांगत खरा मावतेचा धर्म इथे निर्माण होत आहे. या माध्यमातून एक चांगला संदेश दिला जात असून यातून जातीयता आणि धर्मियता कमी होणार असल्याचेही कडू यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे