आंतरराष्ट्रीय

गोदावरी नदी काँक्रीटीकरण मुद्दा पोहचला जागतिक स्तरावर

लंडन डिझाईन बिनाले प्रदर्शनात गोदावरी नदी पुनर्जीवन प्रकल्पाचा समावेश

नाशिक, दि. २२ : नाशिकच्या गोदावरी नदीपात्रातील काँक्रीट काढून दाबले गेलेले जिवंत पाण्याचे स्रोत पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी चालू असलेल्या लढ्याची लंडन डिझाईन बिनाले या प्रदर्शनात  दखल घेण्यात आली आहे. गोदावरी नदीपात्रातील काँक्रिटीकरनानंतर नदी परिसरातील जिवंत जलस्रोतसाठी संशोधन अहवाल डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी दिला असून न्यायालयीन लढाई गोदाप्रेमी देवांग जानी यांनी लढली आहे.

लंडन डिझाईन बिनाले हे प्रदर्शन २०१६ साली सर जॉन सोरेल आणि बेनेई लान्स यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर डिझाईनच्या माध्यमातून जागतिक पातळीवरच्या प्रश्नांना उत्तरे शोधण्या संबंधित एक व्यासपीठ तयार केले आहे. या वर्षी आर्टीस्टिक डायरेक्टर एस. डेव्हलीन यांनी या प्रदर्शनाचे संकलन केले आहे. सदर प्रदर्शन १ ते २७ जून २०२१ या कालावधीत जगभरातील नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या वर्षीचे प्रदर्शन “रेझोनन्स अनुवाद” या संकल्पनेवर आधारित आहे. जगभरातून अश्या कल्पना आणि प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. ज्यांच्यामुळे मुलभूत बद्दल घडू शकतो आणि ज्यांचे अनुकरण केल्यामुळे विविध प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. साधारणता ५० देशांमधून सदर बिनालेसाठी पर्यावरणस्नेही कामे मागवण्यात आली होती. भारतभरातून पर्यावरणस्नेही विषयांच्या अंतर्गत झालेल्या असाधारण मौलिक कामांची निवड करण्याची जवाबदारी या वर्षी बेंगलोर येथील आर्किटेक्ट निशा मेथ्यु-घोष यांनी व त्यांच्या टीमने उचलली. “स्मॉल इज ब्युटीफुल” या तत्वावर आधारित शुद्ध पाणी, हवा, उर्जा आणि वने या क्षेत्रांतील १५९ प्रकल्पांची निवड करण्यात आली असून यामध्ये “शुद्ध पाणी” या सदरात गोदावरी नदीपात्र कॉक्रीटीकरणमुक्त करून जिवंत जलस्रोतचे पुनर्जीवन या प्रकल्पचा समावेश झालेला आहे.

गोदावरी नदीपात्रातील उर्वरित सीमेंट-कॉक्रीटचे थर काढणे गरजेचे असून ते काढल्यास नदीत नैसर्गिकरित्या पाणी उपलब्ध होऊ शकते व जिवंत पाणी पुरातन कुंडात प्राप्त होऊन नदी पुनःप्रवाही होऊ शकते. या संकल्पनेला आणि त्यासाठी लागू केलेल्या कॉक्रीट काढण्याच्या प्रकल्पाला दुजोरा मिळाला आहे. अशी माहिती कॉक्रीटीकरणमुक्त गोदावरी नदीसाठी ७ वर्षांपासून लढा लढणारे व कॉक्रीटमुक्त गोदावरी करणारे देवांग जानी आणि गोदावरी नदीपात्र परिसरातील भूजल पुनर्जीवन संशोधन सादरकर्ते डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी दिली.

नाशिककरांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे की, गोदावरी नदी पुनर्जीवन प्रकल्प जगप्रसिद्ध लंडन डिझाईन बिनालेच्या प्रदर्शनीत समाविष्ट झाला आहे. कॉक्रीटीकरणमुक्त गोदावरी नदी त्यातून प्राप्त झालेले मुबलक जिवंत जलस्रोत याची दखल जागतीक स्तरावर घेतली गेली. गोदावरी नदी परिसरातील जिवंत जलस्रोतसाठी संशोधन अहवाल डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी दिला आहे.
: देवांग जानी, याचिकेकर्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे