आंतरराष्ट्रीय

टोकियो ऑलिंपिकसाठी दाखल युगांडाचा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

टोकिओ, दि. २१  ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिंपिक पुढील महिन्यात  23 जुलैपासून सुरू होणार आहेत. स्पर्धेसाठी विविध देशांचे संघ टोकियोमध्ये दाखल होत आहेत. यात युगांडाच्या संघातील एक खेळाडू नुकताच जपानला पोहोचला. पण त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूने लशीचे दोन डोसही घेतले होते. युगांडाच्या नऊ खेळाडूंच्या पथकातील तो एक सदस्य आहे.

हे पथक युगांडाहून जपानकडे रवाना होत असताना सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी सर्व सदस्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होते. मात्र टोकियोमध्ये संघ दाखल झाल्यानंतर नियमानुसार त्यांची तिथं पुन्हा चाचणी घेण्यात आली. यावेळी पथकातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. या खेळाडूला सध्या सरकारी क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. संघातील इतर सदस्यांना विशेष बसने जपानच्या पश्चिम भागातील ओसाका येथे नेण्यात आलं. तिथं या संघाच्या सराव सत्रांचं नियोजन करण्यात आलं आहे. टोकियो ऑलिंपिकसाठी जपानमध्ये दाखल होणारा युगांडा हा फक्त दुसराच संघ आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे