देश-विदेश

मोदी सरकार लवकरच पॅकेज देण्याच्या तयारीत

नवी दिल्ली, दि. २५ : कोरोना साथीच्या काळात लोकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार लवकरच आणखी एक मदत पॅकेज जाहीर करण्याच्या विचारात आहे. याचा फायदा लहान आणि मध्यमवर्गीय कंपन्यांना होणार आहे. तसेच पर्यटन, विमानचालन आणि प्रवासी उद्योगाशी संबंधित लोकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

लाईव्ह मिंटच्या अहवालानुसार, काही खासगी संस्थांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. त्याबाबत वित्त मंत्रालयाशी चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. सरकार लवकरच असे प्रोत्साहनपर पॅकेज जाहीर करेल. आताच याचे नियोजन केले जात आहे. याबाबत कोणतीही निश्चित मुदत सांगितली गेली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. :

हॉटेल इंडस्ट्री, ट्रॅव्हल इंडस्ट्रीसह अनेक उद्योगांनी सरकारकडे मदत पॅकेजची मागणी केली आहे. त्याचबरोबर उद्योग मंडळाच्या संघटनेने सरकारला कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधामुळे कुटीर, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) संरचित मदत पॅकेजही मागवले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे