आंतरराष्ट्रीय

वादळांना नावं कशी दिली जातात!

  • संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक हवामान संघटना हे जगभरातल्या वादळांच्या नावाची यादी बनवत असते. टायफून हैयान किंवा हरिकेन कॅटरिना यांसारख्या अत्यंत धोकादायक वादळांची नावं बदलण्यात आली आहेत. ज्या देशांमध्ये हरिकेन, टायफून, सायक्लोन वादळं येतात, त्या देशांकडून जागतिक बैठकीदरम्यान वादळांची नावं सुचवली जातात. “2000च्या दशकात बंगालचा उपसागर आणि अरबी समु्द्र यांत येणाऱ्या आठ देशांनी अशा नावांची शिफारस जागतिक हवामान संघटनेला केलं होतं,” “त्यातली 50 टक्के नावं आधीच वापरली गेली आहेत.
देशातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावणार नाही, अशी आशयाचं नाव वादळाला देण्याचा संबंधित देश प्रयत्न करतात, “(आयएमडी) अमेरिका, जपान अशा देशानी वादळाचे नामाभिधान करण्यास सुरुवात केली. सुरुवात अमेरिकेने केली. महिलांची नावे ते चक्रीवादळाना देत. तथापि प्रादेशिक वैशिषट्याची नावे दिली जावीत, हा विचार दृढ झाला. एखाद्या वादळाचा परिणाम कित्येक देशाना भोगावा लागतो. तेव्हा हे नामाभिधान केवळ एका देशाचे न राहता, वादळ निर्मितीस कारणीभूत असलेल्या महासागरीय प्रदेशांच्या झोननुसार असावे, हा मतप्रवाह दृढ झाला. त्यानुसार नॉर्थ अटलांटिक, ईस्ट प्यासिफिक, नॉर्थ प्यासिफिक, वेस्ट प्यासिफिक असे महासागरानुसार काही झोन पाडण्यात आले. त्या झोनमधील देशानी नावे सुचवावीत आणि जसजशी चक्रीवादळे येत जातील तसतशी अनुक्रमे येणा-या वादळाना ती नावे दिली जावीत असा नियम बनवण्यात आला. नाव सुचवणा-या देशावर त्या वादळाचा परिणाम होवो वा न होवो, क्रम पाळला जावा, असे सुचवण्यात आले.
भारत नॉर्थ इंडियन ओशनिक झोनमध्ये येतो. या झोनमध्ये भारत, बाँग्लादेश, मालदिव, म्यानमार, ओमान,पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड हे देश समाविष्ट आहेत. हुधुध हे नाव ओमानने सुचवले होते. निलोफर पाकिस्तानने,तर नानौक बाँग्लादेशने. या झोनचे मुख्यालय ‘रीजीनल स्पेशेलाइजड मीटीओरॉजिकल सेंटर’, नवी दिल्ली इथे मुक्रर करण्यात आले. ताशी 65 कि.मी. पेक्षा अधिक वेगाच्या चक्रीवादळांचे नामाभिधान करण्यात यावे, असे ठरवण्यात आले. आत्तापर्यंत झालेल्या वादळांपैकी काहीची नावे अशी होती ओनीज, अग्नी, हिबास, प्यार, बाज, माला, प्रिया, गिरी, नीलम, हुडहुड, निलोफर इ.
पृथ्वीवर ऋतुमानानुसार वारे व त्यांची दिशा बदलते, पृथ्वीच्या परीवलानामुळे पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती होते. सध्या उत्तर गोलार्धात उन्हाळा सुरु असल्याने उत्तर गोलार्धात जास्त तापमान व कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली आहेत. भारताचा विचार करता संपूर्ण द्वीपकल्प अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात सुळक्यासारखा घुसल्यासारखा वाटतो, ह्या गोष्टीचा विलक्षण परिणाम दक्षिण भारताच्या वातावरणावर परिणाम होतो.
चक्रीवादळ:  “ एखाद्या विशिष्ट ठिकाणी कमी झालेला हवेचा दाब भरून काढण्यासाठी चोहोबाजूंनी वारे त्या भागाकडे वाहू लागतात. प्रत्येक वेळी वादळ तयार होतेच अस नाही, मात्र वाऱ्यामध्ये असलेले बाष्प आणि ते किती वेळाने थंड होतात त्यावर वादळांची निर्मिती अवलंबून असते”
भारतीय उपखंडात पावसाळ्यापूर्वी अशी परिस्थिती असते, त्यामुळे आपल्याकडे साधारणपणे एप्रिल ते जून आणि सप्टेबर ते नोव्हेंबर यादरम्यान बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात चक्रीवादळे तयार होतात. तत्पूर्वी काही मूलभुत बाबी पाहूया:
*वा-याचे 4 प्रकार पाडले जातात.*
1) ग्रहीय वारे किंवा नित्य वारे: व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे, ध्रुवीय वारे यांचा यात समावेश होतो.
2) स्थानिक वारे: काही विशिष्ट प्रदेशात स्थानिक परिस्थितीनुसार वाहणारे वारे. उदा. फॉन, चिनुक, मिस्ट्रल, बोरा इ.
3) नियमित वारे: ठराविक वेळी वा ठराविक ऋतुत वाहणारे वारे. उदा. खारे वारे, मतलई वारे, मोसमी वारे.
4) अनियमित वारे: वातावरणाच्या विशिष्ट परिस्थितीतच असे वारे वाहतात. उदा. आवर्त (चक्रीवादळ), प्रत्यावर्त.
अनियमित वारे: मोसमी, व्यापारी, प्रतिव्यापारी अशा वा-याच्या प्रदेशातच मधूनच केव्हा तरी वादळी वारे वाहतात. भूपृष्ठभागावर काही कारणाने कमी-अधिक दाबाचे टापू निर्माण होतात. तिथे वारे चक्राकार गतीने फिरू लागतात. हे वारे कसे आणि केव्हा निर्माण होतील आणि केव्हा शमतील याचे अंदाज बांधता येत नाहीत. म्हणूनच हे अनियमित वारे होत. हे वारे आवर्त(चक्रीवादळ), प्रत्यावर्त अशा दोन प्रकारचे असतात.
यातही काही प्रकार आहेत.
1)* उष्णकटिबधातील आवर्ते- चक्रीवादळे: काही स्थानिक परिस्थितीमुळे मध्यभागी कमी दाबाचा टापू निर्माण होतो. भोवतालचे वारे कमी दाबाच्या केंद्राकडे वाहू लागतात. या प्रक्रियेत हवेचा भोवरा तयार होतो आपण त्याला चक्रीवादळ म्हणतो. चक्रीवादळाच्या समभाररेषा गोलाकार असतात. अशा आवर्ताचा विस्तार 400-450 कि.मी.पर्यँत असू शकतो. वा-याचा वेगही प्रचन्ड (ताशी 280 ते 300 कि.मी. पर्यँत) असतो. परिणामत: अशा वादळामुळे नुकसानही प्रचन्ड होते.
2) समशीतोष्ण कटिबंधातील आवर्ते: उष्णकटिबधातील आवर्ताप्रमाणेच ही आवर्ते कमी-अधिक दाबाच्या केंद्रामुळे होत असली तरी या दोन आवर्तात भौतिक फरक आहे. या दोन्ही वादळाच्या विस्तारामध्ये फरक असतो. समशीतोष्ण कटिबंधातील आवर्ते ‘डिप्रेशन’ तत्वावर आधारलेली असतात. यातदेखील मध्यभागी कमी दाबाचे क्षेत्र असते. त्याच्याभोवती अधिक दाबाचे क्षेत्र पसरलेले असते. यातील समभाररेषा लंबवर्तुळाकार असतात. उत्तर गोलार्धात समशीतोष्ण कटिबंधात अशी आवर्ते निर्माण होतात. ध्रुवीय प्रदेशाकडून येणारी थंड हवा आणि उष्ण कटिबंधातून येणारी गरम हवा यांचा सन्योग होतो. थंड हवा जड असल्याने ती खाली राहते. गरम हवा हलकी ती वर पसरते. या भिन्न हवांच्या प्रवाहामुळे आवर्ते निर्माण होतात. यांचा विस्तार 1600 कि.मी.पर्यंत असू शकतो. वा-याचा वेग बाकी उष्ण कटिबंधातील आवर्ताहून कमी असतो. ती महासागरावरून आल्यास आपल्या समवेत पाऊस आणतात. अटलांटिक महासागरावरून येणा-या आवर्तामुळे इंग्लंडसारख्या देशात वर्षभर पाऊस पडतो.
3) प्रत्यावर्त: या अनियमित वा-याची आवर्ताच्या उलटी स्थिती असते. काही स्थानी मध्यभागी जास्त दाब व आजूबाजूस कमी दाब निर्माण होतो. वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे चक्राकार वाहू लागतात.
चक्रीवादळाचे वर्गीकरण*
उष्णकटिबंधीय सायक्लोन ही हवामानशास्त्रज्ञांद्वारे वापरली जाणारी सामान्य संज्ञा आहे. उष्णकटिबंधीय पाण्यावर उगम पावणारे ढग आणि झंझावात यांचं मिश्रण जेव्हा चक्राप्रमाणे फिरतं, त्याला सायक्लोन म्हणतात, असं USच्या National Oceanic and Atmospheric Administrationचं म्हणणं आहे. हे सायक्लोन कमीत कमी ताशी 119 किमी वेगानं येऊन धडकत असेल तर त्याच्या उगमानुसार त्याला हरिकेन किंवा टायफून असं संबोधलं जातं. वाऱ्याच्या गतीनुसार हरिकेनचे वर्गीकरण हरिकन 1 ते हरिकन 5 अशा गटांमध्ये केलं जातं.अटलांटिक महासागरात ही वादळं सामान्यतः 1 जून ते 30 नोव्हेंबरदरम्यान येतात. या प्रदेशातील 95 टक्क्यांपेक्षा अधिक वादळं याच कालावधीत येतात. वायव्य पॅसिफिक महासागरातील टायफून मे ते ऑक्टोबरदरम्यान येतात. असं असलं तरी ही वादळं वर्षात कधीही तयार होऊ शकतात. तर दक्षिण पॅसिफिक महासागरात सायक्लोन नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान येतं.
बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे