वृत्त-विशेष

अग्ग बाई सुनबाई मालिकेतील “त्या” दृश्याने शिंपी समाज संतप्त

समाजाची दुरदर्शनच्या माध्यमातूनच जाहीर माफी मागण्याची मागणी

नाशिक, दि. २१ : झी टिव्हीवरील “अग्ग बाई सुनबाई” मालिकेत समस्त शिंपी समाजाचे उपजीवीकेचे साधन असलेल्या शिवणमशीनला लाथ मारून समस्त शिंपी समाजाचा व आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा घोर अपमान केला आहे. याप्रकरणी आंदोलनाचा इशारा समस्त शिंपी समाजाने दिला आहे.
या मालिकेतील गुरुवार दि. २० मे रात्री ८-३० वाजता प्रसारीत झालेल्या एपिसोडमध्ये मालिकेतील महत्वाची व्यक्ती रेखा साकारत असलेले अभिनेते अद्वैत दादरकर यांनी शिंपी समाजाचे उपजीवीकेचे साधन असलेल्या शिवणमशीनला लाथ मारल्याचे दाखवण्यात आले आहे. याप्रकरणी “अग्ग बाई सुनबाई” चे लेखक शुभदा आयरे, शेखर धवलीकर, निर्माता सुनील भोसले, अभिनेता अद्वैत दादरकर आणि दिग्दर्शक व झी टीव्हीने समस्त शिंपी समाजाची दुरदर्शनच्या माध्यमातूनच जाहीर माफी मागावी व चित्रीत केलेला प्रसंग त्वरीत वगळण्यात यावा, अन्यथा समस्त शिंपी समाजाकडून जाहीर आंदोलन छेडले जाईल व त्याची संपूर्ण जबाबदारी ही “अग्ग बाई सुनबाई” चे लेखक शुभदा आयरे, शेखर धवलीकर, निर्माता सुनील भोसले, अभिनेता अद्वैत दादरकर आणि दिग्दर्शक व झी टीव्हीची राहील असे समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र (बाबा) बागुल, मुख्य सचिव संजय खैरनार, सहसचिव आर टी सोनवणे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे