देश-विदेश

करोनामुळे मृत्यू झाल्यास 50 हजार, कर्ता माणूस गेल्यास 2500 पेन्शन, दिल्ली सरकारची ची मोठी घोषणा

नवी दिल्ली, दि. १८ : दिल्ली सरकारने करोनामुळे जीव गमावावा लागलेल्या रुग्णांच्या कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. करोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला 50 हजार रुपये, ज्या घरातील कर्ता माणूस गेला त्या कुटुंबाला गेल्यास 2500 पेन्शनचीही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी (18 मे) पत्रकार परिषद घेत या घोषणा केल्या.

केजरीवाल सरकारच्या 4 प्रमुख घोषणा
1. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी 50 हजार रुपये देणार.

2. ज्या कुटुंबातील कमावती व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय त्या कुटुंबांना दरमहा 2500 रुपयांची पेन्शन दिली जाणार.

3. ज्या मुलांना कोरोनामुळे आपले आई-वडील गमवावे लागले त्यांना दरमहिना 2500 रुपये पेन्शन देणार. तसेच मोफत शिक्षणाची व्यवस्था करणार.

4. 72 लाख रेशनधारकांना दर महिन्याला 5 किलो रेशन देते. या महिन्यात केंद्र सरकार देखील 5 किलो देणार आहे. या महिन्यातील रेशन मोफत असणार आहे.

दिल्लीत मागील 24 तासात 4,482 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 5 एप्रिलपासून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार ही कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मंगळवारी दिल्लीत 265 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. 5 एप्रिल 2021 रोजी दिल्लीत 3,548 रुग्णांची नोंद झाली होती. तसेच संसर्गाचा दर 7 टक्क्यांवरुन 6.89 वर आला होता. हा दर 7 एप्रिलनंतरचा सर्वात कमी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे