वृत्त-विशेष

बँका चार दिवस बंद

मुबंई ।
खासगीकरणाविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँक सेवक आणि अधिकार्‍यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या संघटनांनी 15 व 16 मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक असून सलग चार दिवस सरकारी बँकाचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.
संपात ऑल इंडिया नॅशनलाईज्ड बँक ऑफिसर्स फेडरेशनचे 68000 सभासद सहभागी होणार आहेत. बँकांच्या खासगीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी या क्षेत्रातील नऊ कामगार संघटनांनी संपाची हाक दिली आहे. तत्पूर्वी 13 मार्च रोजी दुसरा शनिवार आणि 14 मार्च रोजी रविवार आणि नंतर सोमवार आणि मंगळवार या संपामुळे सलग चार दिवस सरकारी बँकाचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. संपात युनायटेड फोरम ऑफ बँक या संघटनेच्या नेतृत्वात नऊ संघटना सहभागी होणार आहेत. ज्यात पाच लाख सेवक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बँकिंग व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. या संपाबाबत सरकारकडून कोणतीही चर्चा न झाल्याने संप अटळ असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे