ब्रेकिंग

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमती 1500 पर्यंत कमी करण्याच्या प्रशासनाच्या हालचाली

मुंबई, दि. 10 : राज्यात कोविड-19 या साथरोगाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून दरदिवशी सुमारे 10,000 नवीन रुग्ण वाढत आहेत. आज रोजी राज्यात 98859 सक्रीय रुग्ण आहेत. सदर परिस्थिती बघता राज्यात कोविड-19 या साथरोगाच्या संभाव्य दुसर्‍या लाटेची शक्यता नाकारता येत नाही.
कोविड-19 आजारावर रेमडेसिवीर इंजेक्शन प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. फेब्रुवारी, 2021 पासून रुग्णालये व रुग्णालयांना पुरवठा करणार्‍या घाऊक विक्रेत्यांना या औषधाची विक्री किंमत कमी करण्यात आली परंतू छापील विक्री किंमत कमी करण्यात आली नाही. त्यामुळे सदर विक्री किंमत कमी करण्यात आलेल्या किमतीचा लाभ रुग्णांना न मिळता त्यांचेवर छापील विक्री किमतीनुसार आकारणी होत असल्याने ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड पडत असल्याचे दिसून आले.
याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी पडताळणी केली असता रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादकांनी सदर औषधाची विक्री रुग्णालयांना तसेच रुग्णालयांना पुरवठा करणार्‍या घाऊक विक्रेत्यांना सुमारे 800 ते 1,300 रुपयांनी म्हणजे सरासरी 1,040/- रुपये किंमतीत केल्याचे आढळून आले. रुग्णालयांनी रुग्णांना आकारलेल्या किंमतीबाबत पडताळणी केली असता काही रुग्णालये त्यांच्या खरेदी किमतीवर 10 ते 30 % अधिक रक्कम आकारून मोठ्या प्रमाणावर नफा कमावत असल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात सदर रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादित करणार्‍या उत्पादकांची अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात आल्या. याबाबत आज रोजी अन्न व औषध प्रशासनाने रेमडेसिवीर इंजेक्शन च्या सर्व उत्पादकांना सदर औषधाच्या किंमती त्यांच्या विक्री किंमतीच्या जास्तीत जास्त 30% जास्त आकारून निश्चित करण्याबाबतचे निर्देश दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
  • abc
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे