आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

राज्यात 14 हजार 317 करोनाबाधित; 57 मृत्यू

गुरुवारी दिवसभर राज्यात 14 हजार 317 नवे करोनाबाधित सापडले आहेत. तसेच, 57 रुग्णांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासांतल्या आकडेवारीनुसार राज्यातली एकूण करोनाबाधितांची संख्या आता 22 लाख 66 हजार 374 वर पोहोचली आहे. त्यापैकी 1 लाख 6 हजार 70 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट अजूनही 92.94 टक्के इतका आहे. पण दुसरीकडे सातत्याने वाढणारी बाधितांची संख्या चिंतेत भर टाकू लागली आहे. गुरुवारी दिवसभरात राज्यात एकूण 7 हजार 193 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गुरुवारच्या 57 मृत्यूंसोबत आता राज्यातल्या मृतांचा आकडा देखील वाढून 52 हजार 667 इतका झाला आहे. राज्यातला सध्याचा मृत्यूदर 2.32 टक्के इतका आहे.
आज दिवसभरात मुंबईत 1 हजार 509 नवे करोनाबाधित सापडले असून एकूण बाधितांचा आकडा 3 लाख 38 हजार 643 च्या घरात गेला आहे. तर दिवसभरात झालेल्या 4 मृत्यूंमुळे एकूण मृतांचा आकडा देखील वाढून 11 हजार 519 वर गेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे